Sunday, April 25, 2010

माझा महाराष्ट्र


"माझा महाराष्ट्र" या नावातच सारं काही आलं!

महाराष्ट्र !

या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!

इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला

आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?

जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका 'पोराने' पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले! पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंनगटातली!

ज्योतीराव फुले

'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्‍हे हे मूळ आडनाव. ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.


सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली. मराठीत मंगलाष्टकं रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.


No comments:

Post a Comment